सातारा, सांगलीच्या हद्दीवर 'त्यांनी' पार पाडले कर्तव्य; पोलिसही भारावले

सातारा, सांगलीच्या हद्दीवर 'त्यांनी' पार पाडले कर्तव्य; पोलिसही भारावले

मायणी (जि.सातारा)  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करत येथील माजी सरपंच प्रकाश कणसे व शेजारील माहुलीच्या (ता. खानापूर, जि. सांगली) सरपंच सिंधुताई माने या बंधू-भगिनीने सातारा व सांगली जिल्हा हद्दीवरील चेक पोस्टच्या ठिकाणी आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे केले.
श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती
 
येथील माजी सरपंच कणसे यांना राखी बांधण्यासाठी प्रतिवर्षी त्यांची बहीण शेजारील माहुली (जि. सांगली) येथून मायणीला येत असते. आतापर्यंत त्यामध्ये कधीही खंड पडलेला नाही. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने प्रत्येक जिल्ह्याची हद्द बंद केली. परिणामी शेजारील जिल्ह्यात ये-जा करणे अशक्‍य होऊ लागले. दुसऱ्या जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करायचा असल्यास ई पास काढावा लागत आहे, तरीही ते जिकिरीचे असून, पासही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शक्‍यतो जिल्हा हद्द ओलांडून जाण्याच्या फंदात कोणी पडत नाहीत. अशा स्थितीत पारंपरिक विचारांचा पगडा असलेल्या बहीण-भावापुढे रक्षाबंधन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला. मायणीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चार दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे रक्षाबंधन साजरे करण्यातील अडचणीत वाढच झाली. त्यासंबंधाने बहीण भावात चर्चा झाली.

पांडवकालीन मेरुलिंग; मंदिराच्या गाभाऱ्यात उमटताे तुमचा प्रतिध्वनी

त्यानुसार शासनाच्या जिल्हा हद्दबंदी नियमाचे उल्लंघन न करता रक्षाबंधन साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. नियोजित वेळेनुसार ते ताई-दादा सातारा व सांगली जिल्हा हद्दीवरील चेक पोस्टच्या ठिकाणी एकत्र आले. त्यांनी आपुलकीने एकमेकांशी हितगुज साधले व पारंपरिक पद्धतीने उत्साहात रक्षाबंधन साजरे केले. भाऊरायाला राखी बांधून औक्षण केल्यानंतर सरपंच सिंधुताईंनी चेक पोस्टच्या कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनाही राख्या बांधून औक्षण करण्यात आले. पेढे भरविण्यात आले. त्यापुढे जाऊन "काळजी घ्या' असा आपुलकीचा सल्ला देत सर्वांना मास्कचे वाटप करण्यात आले. त्या अनपेक्षित व अनोख्या रक्षाबंधनाने पोलिस कर्मचारी भारावून गेले. त्यांनीही ही भावाचे कर्तव्य पार पाडले. त्या वेळी विलासराव सोमदे, काकासाहेब माने, प्रदीप माने उपस्थित होते.

भाजीविक्रेत्याच्या कन्येने लावले चार चॉंद 


आमच्यासारख्या सरपंचानीच सर्वप्रथम कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही जिल्हा हद्दीवर रक्षाबंधन करण्याचा निर्णय घेतला. 
 प्रकाश कणसे, मायणी 

संपादन : संजय शिंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com