
दुधेबावी : आजच्या राजकीय परिस्थितीकडे पाहिले असता, (कै.) विनायकराव पाटील यांच्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता लाभणे महत्त्वाचे आहे. निष्ठेचे राजकारण कसे करावे हे विनायक पाटलांकडून शिकावे, असे प्रतिपादन आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
आंदरुड (ता. फलटण) येथील हुरडा पार्टीमध्ये ते बोलत होते.