कोरोनाबाधितांना तत्काळ ऑक्सिजन द्या; रामराजेंच्या प्रशासनाला सक्त सूचना

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात बेडची संख्या वाढवावी, अशा सूचना रामराजेंनी दिल्या.
Ramraje Naik-Nimbalkar
Ramraje Naik-Nimbalkaresakal

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवाव्यात, तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे असा रुग्ण ऑक्सिजन पासून वंचित राहणार याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.

कोरोना प्रतिबंध उपाययोजना बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहत संपन्न झाली. या वेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील,आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात बेडची संख्या वाढवा, अशा सूचना करुन रामराजे नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, 18 वर्षा पुढील युवकांसाठी 1 मे पासून लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे, ही मोहीम कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. तसेच वाढती रुग्णांची संख्या पाहता आरोग्य सुविधा वाढण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये 78 बेडचे कोविड सेंटरचे काम सुरु असून हे कोविड सेंटर येत्या दोन ते तीन दिवसांत सुरु करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची वाढती संख्या पाहता रेमडिसिव्हर औषधाचा अधिकचा पुरवठा जिल्ह्याला व्हावा यासाठीही प्रयत्न करीत आहोत.

ग्रामीण भागातील नागरिक कोरोनाची लक्षण असूनही घरातच उपचार घेत असून शेवटच्य क्षणी ते रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येणार आहे, यासाठी शिक्षकांच्या नेमणूकाही करण्यात येणार आल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले. शासनाने कोरोनाच्या पाशर्वभूमीवर जे निर्बंध घातले आहेत, त्याची जिल्ह्यामध्ये कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलिस विभागाला दिले असल्याचे गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी या बैठकीत सांगितले. या बैठकीमध्ये खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com