

Phaltan Politics Turned Upside Down After Three Decades
Sakal
-अशोक सस्ते
फलटण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च लक्ष घातल्याने राज्यभरात चर्चेत आलेल्या येथील पालिका निवडणुकीत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची पालिकेत असलेली गेली तीस वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. दोन्ही नाईक-निंबाळकर घराण्याच्या अस्तित्वाच्या लढाईत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्तांतर घडवले.