

Ramraje Naik-Nimbalkar
Sakal
आदर्की: नीरा- देवघर आणि धोम- बलकवडीचे पाणी आम्ही आणले, असे काही लोक सांगत आहेत; परंतु जर मुळात नीरा-देवघर धरणच झाले नसते, तर तुमच्या पाइपलाइनला पाणी आले असते का? १९९६ मध्ये मी आमदार झालो, तेव्हा कृष्णा लवादानुसार २००० पर्यंत पाणी अडवणे बंधनकारक होते. अन्यथा ते पाणी कर्नाटक आणि आंध्रला गेले असते. ती रात्र मला आठवते, जेव्हा मी या चिंतेने झोपू शकलो नव्हतो. आम्ही कष्ट उपसले, आज मात्र विरोधक आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम करत आहेत,’ असे प्रतिपादन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.