esakal | ऐतिहासिक पालला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ; रामराजेंची ग्वाही
sakal

बोलून बातमी शोधा

Ramraje Naik-Nimbalkar

इतिहासाच्या खाणाखुणा आपण जतन केल्या नाहीत, तर काळाच्या ओघात त्या गडप होण्याची शक्यता आहे.

ऐतिहासिक पालला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ; रामराजेंची ग्वाही

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : पाल (ता. वेल्हे) गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पत्नी व छत्रपती संभाजीराजेंच्या मातोश्री छत्रपती सईबाई राणीसाहेब (Chhatrapati Saibai Ranisaheb) यांची समाधी आहे. गेली बरेच वर्षे हा समाधी परिसर दुर्लक्षित होता. या ठिकाणी सईबाईंच्या स्मारकाच्या माध्यमातून पाल गाव व परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार असल्याची ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांनी दिली.

पाल येथे सईबाई राणीसाहेब यांच्या समाधी स्मारकाचे भूमिपूजन रामराजेंच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, अरविंद पासलकर, पालचे सरपंच गोरख शिर्के, कुलदीप कोंडे, बापूसाहेब धुमाळ, करणसिंह बांदल उपस्थित होते. सईबाई राणीसाहेबांच्या समाधीच्या स्मारकाबाबतची पुढील जबाबदारी मी स्वतः उचलली आहे. या गावाला पर्यटनस्थळ म्हणूनच विकसित करण्यासाठी प्रयत्न करू.

हेही वाचा: 48 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आंबेनळी घाटातील वाहतूक सुरु

नुसते समाधी किंवा स्मारक बांधून उपयोग नाही, तर त्याचे संवर्धन करणेही गरजेचे आहे, असेही रामराजेंनी स्पष्ट केले. इतिहासाच्या खाणाखुणा आपण जतन केल्या नाहीत, तर काळाच्या ओघात त्या गडप होण्याची शक्यता आहे. पुढच्या स्मरणदिनी हे स्मारक पूर्ण झाले पाहिजे, या दृष्टीने आपण सर्व रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली काम करू, असे आवाहन संजीवराजेंनी केले. गणेश खुटवड-पाटील यांनी प्रास्ताविकात स्मारकाविषयी माहिती दिली. स्मारकाचे वास्तू रचनाकार अमोल पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला.

loading image
go to top