फलटण : गेली ३० वर्षे संघर्ष करून मी फलटण मतदारसंघात पाणी आणलं. मतं मिळवण्यासाठी नव्हे, तर जनतेसाठी आम्ही कामं केली. मी हे केलं, ते केलं, असं जे विरोधक म्हणतात ना, त्या ९० टक्के कामांचा पाया मी घातलाय. पाया मी घातलाय, कळस लावायला हे पुढे आहेत, असा उपरोधिक टोला आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विरोधकांना लगावला.