

Ranjit Patil addressing supporters in Karad, announcing plans to unite independent candidates for the upcoming elections.
Sakal
कऱ्हाड : शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कऱ्हाडला कोट्यवधींचा भरभरून निधी दिला. मात्र त्याच कऱ्हाडमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर पालिकेच्या निवडणुका लढता येत नाहीत, याची खंत आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय प्रभागातील समविचारी अपेक्षांची मोट बांधत आहे. त्याव्दारे पालिकेत नवा पर्याय देणार आहे. आत्ता पाच अपक्ष सोबत येथेच आहेत. त्यासह १२ जण संपर्कात आहेत. त्यामुळे अपक्षांचा पर्याय प्रभावाला मतदार साथ देतील, असा विश्वास शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते व नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार रणजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.