
वाई : वाई- खंडाळा विधानसभा मतदारसंघातील गावागावांतील कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी, सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणार असल्याची ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी दिली.