
सातारा : जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा पदग्रहण समारंभ, तसेच संविधान आणि लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ येत्या शनिवारी (ता. १४) दुपारी तीन वाजता साताऱ्यात मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.