

Satara District Bank President Election Ranjitsinh Nimbalkar Questions Mahayuti Leaders Over Lack of Joint Discussion
sakal
फलटण : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचा प्रतिनिधी असायला हवा होता, अशी अपेक्षा होती. जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढविण्यात आली असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या वेळीही महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही तशीच अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही, असे मत माजी खासदार तथा जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.