
Unique Albino Tusker Discovered in Karad’s Old Yerwle Forest
Sakal
विंग/कोळे: तस्कर जातीचा बिनविषारी मात्र दुर्मिळ असा अल्बीनो तस्कर साप जुने येरवळे गावात आढळून आला आहे. त्याला ट्रिकेट स्नेक असेही म्हणतात. दुर्मिळ अल्बीनो सापाला सर्पमित्र विशाल खंडागळे, विनोद पानस्कर, सागर बिंद्रा आणि अनिकेत यादव यांनी सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासातही सोडले. कऱ्हाड तालुक्यातील पहिली व सातारा जिल्ह्यात हा अल्बीनो सापडल्याची तिसरी नोंद ठरली आहे.