कुकुडवाडला दुर्मीळ पोलकीचे झाड

जिल्ह्यातील एकमेव झाड असल्याची वनस्पती तज्‍ज्ञांकडून शक्यता
Rare polka tree at Kukudwad man Taluka satara
Rare polka tree at Kukudwad man Taluka satara

दहिवडी - माण तालुक्यातील कुकुडवाड परिसरात पोलकीचे (Givotia moluccana) झाड आढळले आहे. जिल्ह्यातील हे एकमेव झाड असावे, असे वनस्पती तज्‍ज्ञांचे मत आहे. कुकुडवाड येथील निसर्गमित्र अजित काटकर यांना भटकंती दरम्यान हे झाड आढळले. प्रख्यात वनस्पती तज्‍ज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांच्या पुस्तकातील या झाडाविषयी माहिती शोधली असता, हे दुर्मीळ झाड असल्याचे दिसत आहे.

प्रा. महाजन यांच्या नोंदीनुसार फक्त दक्षिण भारतात प्रदेशनिष्ठ असलेले हे मध्यम आकाराचे झाड पानझडी जंगलात फारच तुरळकपणे आढळते. महाजन यांनी केलेल्या नोंदीनुसार हे झाड महाराष्ट्रात पुणे परिसरात काही ठिकाणी, कर्नाटक राज्यात धारवाड, बेल्लारी आदी भागात तसेच भारताबाहेर श्रीलंकेत आढळते.

साधारण सहा ते दहा मीटर उंच वाढणारे पोलकीचे झाड पानझडी प्रकारात मोडते. झाडाच्या कोवळ्या फांद्या, पाने, कळ्या आणि फुले पांढऱ्या रंगाच्या दाट केसाळ आवरणामुळे वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्याने मढवलेल्या दिसतात. या झाडाची शिशिर ऋतूत पानगळ होते आणि वसंतात नवीन पालवी येते.

पावसाळ्यात फुले येतात. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या झाडाला फळे लागतात. फळे गोलसर, सुमारे दोन सेंटिमीटर व्यासाची असून त्यात एकच बी असते. मात्र, या झाडाच्या बिया रुजून नवीन झाड कसे बनते, याविषयी माहिती उपलब्ध नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com