

Endangered Indonesian Maleo Bird Gets New Life After Rescue in India
sakal
पाचगणी: निसर्गाचे वरदान लाभलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी परिसरात एक सुखद घटना घडली. चक्क सातासमुद्रापार इंडोनेशियातील सुलावेसी बेटांवर आढळणारा अतिशय दुर्मिळ आणि ‘निसर्गाचा चमत्कार’ मानला जाणारा ‘मलेओ’ पक्षी कुंभरोशीतील एका शेतात जखमी अवस्थेत आढळून आला. स्थानिकांची तत्परता आणि वन विभागाच्या तातडीच्या उपचारांमुळे या जागतिक स्तरावर संकटग्रस्त असलेल्या पक्ष्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आले आहे.