
"Bhajani Mandals awaiting clarity on registration rules for ₹25,000 government grant."
Sakal
-संदीप पारवे
मसूर : भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यातील १८०० मंडळांना २५ हजारांचे भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे चार कोटींचा हा निधी आहे. भजनी मंडळांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे. जिल्ह्यात भजनी मंडळाची संख्या हजारात आहे. त्यातच नोंदणीकृत भजनी मंडळांनाच हा लाभ मिळणार असल्याने, बहुतांश भजनी मंडळांपुढे नोंदणीची अट म्हणजे कटकट अशी वस्तुस्थिती आहे.