कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन अपूर्णच

शासनाकडून ३५ वर्षांत ५०० बैठका; शासकीय दप्तर दिरंगाईसह राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
Rehabilitation of Koyna dam incomplete Ajit Pawar Devendra Fadnavis satara
Rehabilitation of Koyna dam incomplete Ajit Pawar Devendra Fadnavis sataraesakal

कऱ्हाड : सहा दशकांपासून कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही मागण्या मान्य करत धरणग्रस्तांना दिलासा दिला असला तरी पुनर्वसनाच्या प्रश्नाला अद्यापही अपेक्षित गती आलेली नाही. धरणग्रस्तांचे पुनर्वसन मार्गी लागण्यासाठी ३५ वर्षांत ५०० बैठका शासनाने घेतल्या. मात्र, तरीही पुनर्वसनाचे घोडं अडलेलेच आहे. त्यामुळे निर्णायक टप्प्यावर लढतीचा निर्णय धरणग्रस्त घेण्याच्या मार्गावर आहेत. शासकीय दप्तर दिरंगाईसह व राजकीय इच्छाशक्तीअभावी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागताना दिसत नाही.

धरणग्रस्तांच्या चौथ्या पिढीने तीन वर्षांपूर्वी महिनाभर ऐतिहासिक आंदोलन केले. त्याकडे राज्याचे लक्ष वेधले गेले. त्यावेळी जी काही आश्वासने दिली गेली, त्यात कोयनेच्या धरण्रस्तांच्या पदरी निराशाच आली आहे. सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली. ती केवळ गर्जनाच ठरली. राज्यात सत्ता बदल, कोरोनाची स्थिती, प्रशासकीय दप्तर दिरंगाईसह राजकीय इच्छाशक्तीचा मोठा अभाव धरणग्रस्तांच्या परवडीस कारणीभूत आहे. तब्बल ६५ वर्षांपूर्वीपासून धरणग्रस्तांची परवड सुरू आहे. १९५४ पासून धरणग्रस्तांना प्रतीक्षा आहे. १९७९ पासून श्रमिक मुक्ती दल त्यांच्या खांद्याला खांदा देवून लढा देत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात १९८६ पासून पुनर्वसन आढावा बैठकीला प्रारंभ झाला. ३५ वर्षांत ५०० बैठका झाल्या. तरीही पुनर्वसनाचे घोडे अडलेलेच आहे. केवळ पाच टक्केच धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागले आहेत.

धरणग्रस्तांच्या रखडलेल्या पुनर्वसनास गती मिळावी, यासाठी तीन वर्षांपूर्वी टास्क फोर्सची स्थापना केली. त्यानंतर आजअखेर टास्क फोर्सची एकही बैठक झालेली नाही. कोयना धरणग्रस्तांनी ऑक्टोबरमध्ये आंदोलन केले. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ते काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही काहीही हालचाल नाही.

...अशी आहे स्थिती

  • टास्क फोर्सला मे २०१८ पर्यंतची डेडलाईन. त्याला मुदतवाढ

  • वाढलेल्या मुदतीतही टास्क फोर्सचा अहवाल अपूर्णच

  • उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशांचीही पूर्तता नाही

  • धरणग्रस्तांसाठी वॉररूमची स्थापना करण्याकडे जिल्हास्तरावर दुर्लक्ष

  • महावितरण व जलसंपदाच्या सवलतींबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी प्रयत्नच नाहीत

  • धरणग्रस्तांच्या सिंचन आणि घरगुती वीजबिल शून्य करण्याकडे दुर्लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com