विमानतळाच्या अटी शिथिल होण्याचा मार्ग मोकळा; पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली दिल्लीत बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार पृथ्वीराज चव्हाण

विमानतळाच्या अटी शिथिल होण्याचा मार्ग मोकळा; पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली दिल्लीत बैठक

कऱ्हाड: केंद्रीय मंत्रालयाने कलर कोडींगला परवानगी दिल्याने विमानतळाची २० किलोमीटरच्या परिघातील बांधकामावर बंदीच्या जाचक अटी निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विमानतळाच्या कलर कोडेड झोनिंग नकाशाला दिल्ली येथील केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व भारतीय विमानपतन प्राधिकरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी तत्काळ परवानगी दिली आहे. त्यानुसार कलर कोडींगची राज्यातील सर्वच विमानतळावर अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा: Satara | हिम्मत असेल तर समोरासमोर या : उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजे यांना आव्हान,पाहा video

येथील विमानतळाच्या अटीमुळे बांधकाम परवाना प्रश्न लागला मार्गी लावण्यासाठी आमदार चव्हाण यांनी कऱ्हाड, मलकापूरच्या काही नगरसेवकांसह बांधकाम व्यवसायिकांसमवेत दिल्ली येथे भारतीय विमानपतन प्राधिकरणचे अध्यक्ष संजीवकुमार व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांची भेट घेतली. त्या भेटीत निर्णय झाला आहे. आमदार चव्हाण यांच्यासोबत प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, क्रिडाईचे तनय जाधव, कॉग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, नगरसवेक इंद्रजीत गुजर, जावेद शेख, धनराज शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा: Satara : सोसायटी निवडणुकीत महाविकास आघाडीचं जबरदस्त वर्चस्व

आमदार चव्हाण म्हणाले, कऱ्हाडसहीत मलकापूर शहरासह विमानतळाची अटीचा महत्वाचा विषय आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. काही दिवसांपूर्वी विमानतळ प्राधिकरणाकडून सर्वच विमानतळाच्या परीघातील २० किलोमीटरच्या बांधकामावर बंदी घातली होती. त्या अटींमध्ये शिथिलता व सुस्पष्टता यावी यासाठी बांधकाम व्यावसायिक व क्रिडाईच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले होते. त्यानुसार आज भेट दिल्ली केंद्रीय मंत्र्याची भेट घेतली. त्यापूर्वी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून व त्यानंतर प्रत्यक्ष मुंबईमध्ये चर्चा झाली होती मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासमवेत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सिंदिया व सचिव संजीव कुमार यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी कलर कोडेड झोनिंग नकाशा तयार करून मान्यतेसाठी केंद्रीय विभागाला पाठविला होता. तो नकाशा तात्काळ प्रसिद्ध व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्र्यासह सचिवांची भेट घेऊन चर्चा केली. विमानतळ प्राधिकरणाच्या निर्बंधांमुळे कऱ्हाड परिसरातील बांधकाम ठप्प आहेत, त्यांना लवकरात लवकर गती मिळण्यासाठी व शहराच्या विकासासाठी विमानतळ प्राधिकरणाने कलर कोडेड झोनिंग नकाशा प्रसिद्ध करावा अशी मागणी केली आहे. त्यानुसार तात्काळ त्याचा गांभीर्याणे विचार करून केंद्रीय मंत्र्यांनी कलर कोडेड झोनिंग नकाशाला परवानगी दिली आहे. अटींमध्ये सुस्पष्टता व शिथिलता आणून नवीन नियमावली जाहीर करण्याचे आदेश महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला दिले आहेत. त्याची अंमलबजावणी संबंधित विभागाकडून झाली आहे, यामुळे बांधकाम व्यावसायिक व नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

Web Title: Relaxation Airport Conditions Prithviraj Chavan Held Meeting Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top