

Sugarcane cutting labourers and their children braving cold nights at a temporary settlement.
sakal
-केराप्पा काळेल
कुकुडवाड : परिसरात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने मागील १५ दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. या बोचऱ्या थंडीने नागरिक त्रस्त झाले असतानाच, नदीकाठांवरील उसाच्या पट्ट्यात तोडणीसाठी दाखल झालेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना या थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऊसतोड मजुरांसह त्यांच्या लहान मुलांनाही प्रतिकूल हवामानाचा फटका बसत आहे.