
Reservation declared for 11 Panchayat Samitis in Satara; women to lead in six talukas under new allocation.
Sakal
सातारा: जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांसाठी आज जाहीर झालेल्या सभापतिपदाच्या आरक्षण सोडतीत सातारा, वाई, जावळी, माण पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाले, तर खंडाळा, पाटण, कऱ्हाडचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी, महाबळेश्वरचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले, तसेच फलटण, कोरेगावचे सभापतिपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. खटावचे सभापतिपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने येथील इच्छुकांना उपसभापतिपदासाठी फिल्डिंग लावावी लागणार आहे.