esakal | आमच्या मागण्या पूर्ण करा; आशा, गटप्रवर्तकांचे सहकारमंत्र्यांना साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Asha Workers

कोरोना महामारीच्या संकटात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक दोन वर्षांपासून जिवाची पर्वा न करता काम करत आहेत.

आमच्या मागण्या पूर्ण करा; आशा, गटप्रवर्तकांचे सहकारमंत्र्यांना साकडे

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : आशा स्वयंसेविका (Asha Workers) व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपास 100 टक्के प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या (Coronavirus) काळातही तुटपुंज्या मानधनात काम करूनही मागण्या मान्य होत नसल्याने आजपासून बेमुदत संप सुरु केला आहे. सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil), खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (Response To Asha Workers Agitation At Karad Satara Marathi News)

कोरोना महामारीच्या संकटात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक दोन वर्षांपासून जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. मात्र, कामाचे वेतन हे तुटपुंजे मिळत आहे. त्यातच त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मानधन कमी आणि काम जास्त अशी स्थिती झाली आहे. त्यासंदर्भात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी संप सुरु केला आहे.

हेही वाचा: शेरेत 'माऊली'नं फुलवलं नंदनवन; पाच एकर जागेत तब्बल 400 वृक्षांची लागवड

त्यांनी आशांना प्रतिदिन 500 रुपये मानधन द्यावे, सॅनिटायझर (Sanitizer), हॅण्डग्लोज, मास्क, थर्मामीटर द्यावे, सर्व आशा व गटप्रवर्तकांना 50 लाखांचे विमा संरक्षण लागू करावे, आशा व गटप्रवर्तकांना सरकारी कर्मचाऱ्यांना दर्जा मिळावा, तो मिळेपर्यंत आशांना 18 हजार, तर गटप्रवर्तकांना 22 हजार रुपये प्रतिमहा वेतन द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या संपास आज 100 टक्के पाठिंबा मिळाला. पालकमंत्री पाटील, खासदार पाटील यांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Response To Asha Workers Agitation At Karad Satara Marathi News

loading image