Jayakumar Gore : आमदार जयकुमार गोरेंच्या जामीन अर्जावर उद्या निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayakumar Gore

आमदार गोरेंवर दहिवडी पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल झाला आहे.

Jayakumar Gore : आमदार जयकुमार गोरेंच्या जामीन अर्जावर उद्या निकाल

वडूज (सातारा) : मायणी (ता. खटाव) येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासंदर्भात आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी वडूज येथील सत्र न्यायालयात (Vaduj Session Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून उद्या (शुक्रवार) पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती दिली.

मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्‍यात (Dahiwadi Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली आहे.

हेही वाचा: किसन वीर निवडणुकीत शिवसेनेच्या आमदाराची जादू चाललीच नाही

यापूर्वी या गुन्ह्यामध्ये संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. आज अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. यावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने याबाबतचा निकाल उद्या देणार असल्याचे सुनावले. याबाबत फिर्यादीच्या बाजूने सरकारी वकील मिलिंद ओक यांनी बाजू मांडली.

Web Title: Result Of Mla Jaykumar Gore Bail Application Tomorrow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top