मलकापुरात साकारतेय महसूल वनराई

पालिका आणि महसूल विभागाचा संयुक्त उपक्रम; दत्तनगर येथे वृक्षारोपण
Revenue Forestry is being implemented in Malkapur Municipalities and Revenue Department
Revenue Forestry is being implemented in Malkapur Municipalities and Revenue Department

मलकापूर - पालिका व महसूल विभागाच्या माध्यमातून शहरात महसूल वनराई साकारली जात आहे. त्याअंतर्गत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दत्तनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. शहरांमध्ये हा पहिलाच प्रयोग असून, तो यशस्वी करण्यासाठी संबंधित विभागातील महिलांनी प्रत्येकी एक रोप दत्तक घेतले आहे. त्याचे संगोपन व संवर्धनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली असून, वृक्ष संवर्धनाबाबत जागृती होणार आहे.

वृक्षारोपणास अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते, जिल्हा भूसंपादन अधिकारी श्रीमती कीर्ती नलवडे, तहसीलदार विजय पवार, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपाध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण सभापती गीतांजली पाटील, नगरसेवक दिनेश रैनाक, सामाजिक कार्यकर्ते राजू मुल्ला, शहाजी पाटील, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, मंडल अधिकारी पंडित पाटील आदी उपस्थित होते.

उपनगराध्यक्ष शिंदे म्हणाले, ‘‘मलकापूरने प्रतिवर्षी शहरातील हरित अच्छादन वाढावे, यासाठी विविध ठिकाणाहून वृक्षरोपे खरेदी करून त्याचे रोपण केले आहे. राजमंड्री, आंध्र प्रदेश, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथून औषधी वनस्पती आणल्या आहेत. त्यातून हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास मदत झाली आहे.’’ श्रीमती सरदेशमुख यांनी पालिकेने शहरात राबवलेल्या कामाचे कौतुक करून इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुद्धा या पद्धतीने काम करावे, असे मत व्यक्त केले.

अशी मिळेल वृक्षांची माहिती

पालिकेने माझी वसुंधरा २.० अंतर्गत वृक्षगणना पूर्ण केली आहे. शहरातील नागरिकांनी स्वतः लावलेली व पालिकेमार्फत लावलेली अशा ४० हजार ५२४ वृक्षांची नोंद झाली आहे. त्यामध्ये १७१ प्रकारच्या वृक्षांच्या प्रजाती, हेरिटेज ट्री -४५, मूळ देशी प्रजाती- ३३ हजार ४३८ व इतर सात हजार ८६ वृक्षांचे प्रकार आहेत. पालिका हद्दीमध्ये पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ४५ वृक्षांचे जिओ टॅगिंगसह फोटोची माहिती संकलित करण्यात आली असून, ती पालिकेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com