esakal | जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पोलिसांकडूनच हरताळ; मल्हारपेठचा 'महसूल' पाटणच्या तिजोरीत!
sakal

बोलून बातमी शोधा

Malharpeth Police

मल्हारपेठ ग्रामपंचायत हद्दीत कऱ्हाड-पाटण मार्गावर विनाकारण फिरणाऱ्यांना दंड केला जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पोलिसांकडूनच हरताळ

sakal_logo
By
विलास माने

मल्हारपेठ (सातारा) : पोलिसांव्दारे मल्हारपेठ-नवारस्ता (Malharpeth-Navarasta) येथील दंड आकारणीसाठी पाटण नगरपंचायतीचे (Patan Nagar Panchayat) पावती पुस्तक वापरण्यात आले. पोलिसांकडून आत्तापर्यंत दंड आकारणी केलेला महसूल (Revenue) पाटण नगरपंचायतीला वर्ग करण्यात आला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मल्हारपेठ पोलिसांकडूनच (Malharpeth Police Station) हरताळ फासला जात आहे. दंड आकारणीतून जमा झालेला महसूल मल्हारपेठ ग्रामपंचायतीला (Malharpeth Gram Panchayat) वर्ग करण्याची मागणी होत आहे. (Revenue Of Malharpeth Gram Panchayat Was Transferred To Patan Nagar Panchayat By The Police)

मल्हारपेठ ग्रामपंचायत हद्दीत कऱ्हाड-पाटण मार्गावर (Karad-Patan Route) विनाकारण फिरणाऱ्यांना दंड केला जात आहे. मात्र, तो दंड थेट पाटण नगरपंचायतीच्या तिजोरीत जात आहे. मल्हारपेठ वेगळी स्थानिक स्वराज्य संस्था असताना पोलिसांकडून पाटण नगरपंचायतीच्या वतीने दंड आकारणी का केली जात आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: आपत्तीत हलगर्जीपणा चालणार नाही; गृहराज्यमंत्र्यांचे सक्त आदेश

याबाबत नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना विचारले असता ‘आम्ही तसा आदेश दिला नाही. पोलिसांकडूनच दंड आकारला जात आहे’, असे सांगण्यात आले. मल्हारपेठ ग्रामपंचायतीचे दंड आकारणी पावती पुस्तक दिले असतानाही पाटण नगरपंचायतीची दंड आकारणी केली जात होती. त्यामुळे नक्की दंड आकारणी पावती पुस्तकाचे गौडबंगल काय? कोणाच्या आदेशाने दंड आकारणी चालू आहे? हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. ग्रामपंचायतीचा बुडालेला महसूल पाटण नगरपंचायतीने परत करण्याची मागणी ग्रामसेवक एच. एस. पवार यांनी केली आहे.

हेही वाचा: 'कृष्णा'च्या पहिल्याच निवडणुकीत उंडाळकर गटाचा कस लागणार?

पावती पुस्तकाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मल्हारपेठ ग्रामपंचायतीचे पुस्तक दंड आकारणीस वापरण्याचे आदेश दिले आहेत.

-श्रीरंग तांबे, प्रांताधिकारी, पाटण

Revenue Of Malharpeth Gram Panchayat Was Transferred To Patan Nagar Panchayat By The Police

loading image