धक्कादायक! 'साताऱ्यात रिक्षा चालकाने महिला पोलिसाला नेले फरफटत'; थरारक पाठलाग, सात जणांना उडवले, महिला गंभीर
High Drama in Satara: हवालदार भाग्यश्री जाधव असे जखमी पोलिस महिलेचे नाव आहे. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या येथील मुख्य बस स्थानकाबाहेर वाहतूक नियमनासाठी कार्यरत होत्या. यादरम्यान, डायल ११२ या हेल्पलाइन क्रमांकाला मोळाचा ओढा परिसरातून एक कॉल गेला.
“Shocking scene in Satara – Rickshaw driver drags woman police officer and injures pedestrians during escape.”Sakal
सातारा: अपघात करून पळून जाणाऱ्या रिक्षाचालकाने एका महिला पोलिसाला सुमारे शंभर मीटर फरफटत नेले. यामध्ये महिला पोलिस जखमी झाली आहे. रिक्षाचालकाला ताब्यात घेण्यात आले असून, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.