
सातारा: गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या वातावरणामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. मुले शाळा, मैदानावर एकमेकांच्या सहवासात येतात. त्यामुळे संसर्गजन्य आजार होत असल्याचे चित्र आहे.