धक्कादायक! गर्भवतींसह मुलांमध्ये संसर्गाचा धोका; 'सिव्हिल'मध्ये सरसकट सर्वांची एकाच ठिकाणी तपासणी

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे.
Pregnant Women
Pregnant Womenesakal

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधितांची तपासणी व उपचाराची सुविधा करण्यात आली आहे. परंतु, सरसकट सर्वांसाठी एकाच ठिकाणी ही सुविधा असल्यामुळे गर्भवती (Pregnant Women) व लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग (Coronavirus) वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर किमान या दोन घटकांसाठी तरी स्वतंत्र तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपचारासाठी नेमणूक करणे आवश्‍यक आहे. (Risk Of Corona Infection In Pregnant Women And Children Satara News)

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील आधुनिक ब्लड बॅंकेसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये कोरोनाची चाचणी व बाधित आल्यानंतर औषधे मिळण्याची सुविधा करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नागरिकांच्या कोरोना चाचण्या या जिल्हा रुग्णालयातील या केंद्रावर होतात. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होते. कोरोना चाचणी करण्यासाठी येथे नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी करेपर्यंत सहा वेळा रांगेमध्ये उभे राहावे लागते. सुरवातीला केसपेपरसाठी, त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून रॅटची टेस्ट लिहून घेण्यासाठी, त्यानंतर प्रत्यक्ष रॅट टेस्टसाठीच्या रांगेत उभे राहावे लागते. रॅट चाचणीचा अहवाल येईपर्यंत नागरिकाला 15 ते 20 मिनिटे त्या परिसरातच बाजूला थांबावे लागते. रॅट टेस्ट पॉझिटिव्ह आली तर, औषधाच्या रांगेत जावे लागते. परंतु, ती निगेटिव्ह आली तर, आरटीपीसीआर टेस्टचा फॉर्म भरून घेण्यासाठी रांग, ती झाली की आरटीपीसीआर किट मिळविण्यासाठी व नंतर आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठीच्या रांगेत नागरिकांना थांबावे लागते.

Pregnant Women
वाड्यावस्त्यातील प्रत्येक नुकसानग्रस्तापर्यंत तातडीने पोचा; शंभूराज देसाईंच्या सक्त सूचना

गर्दीच्या काळात ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यासाठी नागरिकांना तासन्‌ तास रांगेमध्ये काढावे लागतात. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा दर हा किमान 35 टक्‍क्‍यांच्या जवळ असतो. त्यामुळे दहा जणांच्या रांगेत किमान तीन तरी पॉझिटिव्ह नागरिक असतात. कितीही प्रयत्न केले तरी, या रांगेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. अगदी खेटून लोक एकमेकांजवळ उभे असतात. त्यातूनही कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका आहे. त्यातही लहान मुले व गर्भवती यांच्यासाठी हा धोका अधिक वाढतो. कोरोना संसर्गाचा धोका आहेच, त्याचबरोबर या गटाला तातडीने योग्य औषधोपचार होणे आवश्‍यक असते. त्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्यांची लक्षणे जाणून घेणे व त्यानुसार औषधोपचारात बदल करणे आवश्‍यक आहे. परंतु, सध्या या ठिकाणी सरसकट एकाच प्रकारची औषधे दिली जातात. त्यातही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची त्यासाठी नेमणूक नाही. त्यामुळे किमान लहान मुलांना बालरोग तज्ज्ञ तसेच प्रसूती तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली गर्भवतींवर उपचार होणे अत्यावश्‍यक आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

लहान मुलांच्या धोक्‍याकडे हवे लक्ष

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकट्या एप्रिल महिन्यात शून्य ते 14 वयोगटातील दोन हजार 600 मुले बाधित झाली आहेत. गर्भवती मातेबरोबरच कोरोनामुळे तिच्या पोटातील बाळालाही धोका निर्माण होऊ शकतो किंवा प्रसूती काळात काही अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे या दोन्हींवर योग्य उपचारासाठी स्वतंत्र उपाययोजना होणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने त्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.

VIDEO पाहा : तौक्ते चक्रीवादळाचा कास, बामणोलीला तडाखा; महाबळेश्वरात 'मुसळधार'

Risk Of Corona Infection In Pregnant Women And Children Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com