

Tightrope for Survival: Child Performer in Satara Highlights Dire Poverty
Sakal
-भोलेनाथ केवटे
सातारा : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्ध वारसा लाभलेल्या साताऱ्यात एक मोठा वर्ग पोटासाठी जीवघेणा संघर्ष करीत आहे. पोवई नाका परिसरात एक लहान मुलगी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उपजीविकेसाठी ‘तारेवरची कसरत’ करताना दिसली. रस्त्यावर दोन्ही बाजूला काठ्यांना बांधलेल्या दोरीवर सुरू असलेले कसरतीचे खेळ पाहायला नागरिकही गर्दी करीत आहेत. काही जण तिला मदतही करत आहेत. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी तिने लावलेली ‘जान की बाजी’ प्रशासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.