कोयत्याच्या धाकाने दहिवडीत लूट

दहिवडी ते फलटण रस्त्यावरील पेट्रोल पंपावर २१ हजार रुपयांची रोकड पळवली
Robbery Case
Robbery CaseSakal

दहिवडी - दहिवडी ते फलटण रस्त्यावर असलेल्या बालाजी पेट्रोल पंपावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून २१ हजार रुपयांची रोकड पळवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

येथील दहिवडी- फलटण रस्त्यावर बालाजी पेट्रोल पंप आहे. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी असलेला कर्मचारी पेट्रोल विक्रीचे काम करत असताना दुचाकीवरून आलेल्या युवकांनी त्या कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील २१ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून काही संशयितांचा तपास सुरू केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com