पोहण्यासाठी गेलेल्या रुईतील मुलाचा बुडून मृत्यू

राजेंद्र वाघ
Tuesday, 15 September 2020

पोलिस नाईक कुंभार तपास करत आहेत.

कोरेगाव (जि. सातारा) : रुई (ता. कोरेगाव) येथील एका 12 वर्षे वयाच्या मुलाचा गावच्या हद्दीतील सिमेंट बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन सतीश कांबळे (वय 12, रा. रुई, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव आहे. यासंदर्भात सचिन संपत ननावरे (रा. रुई) यांनी फिर्याद दिली आहे.

...तरच रुग्ण संख्या कमी होईल; शशिकांत शिंदेंचे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

त्यात म्हटले आहे, की साेमवारी (ता.14) सकाळी साडेनऊच्या सुमारास रोहन रुई गावाच्या हद्दीतील म्हारकी नावाच्या शिवारातील सिमेंट बंधाऱ्यामध्ये पोहण्यासाठी गेला होता. पाणी जास्त असल्याने त्याला पोहता न आल्याने गटांगळ्या खाऊन पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस नाईक कुंभार तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohan Kamble Fall Down In Ketty Bandhara Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: