esakal | 'फोटो काढून फेसबुकवर मिरवण्याशिवाय नगराध्यक्षांनी काहीच काम केलेले नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

'फोटो काढून फेसबुकवर मिरवण्याशिवाय नगराध्यक्षांनी काहीच काम केलेले नाही'

ही विशेष सभा कोणाच्याही दबावाखाली नाही तर सभेत काही विनाकारण होणाऱ्या गोंधळामुळे सदस्यांबद्दल चुकीची व नकारात्मक प्रतिमा शहरात तयार होऊ नये, म्हणून सभा रद्द केली अशी माहिती नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली.

'फोटो काढून फेसबुकवर मिरवण्याशिवाय नगराध्यक्षांनी काहीच काम केलेले नाही'

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : पालिकेची मासिक सर्वसाधारण सभा न घेता प्रत्येक वेळी विशेष सभा बोलावण्याची गरज काय, असा सवाल करत जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांनी थेट नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनाच ऑनलाइन झालेल्या सभेत धारेवर धरले. त्याच मुद्यावरून महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान व नगराध्यक्षा शिंदे यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. अखेर सर्वानुमते होणारी विशेष सभा रद्द झाली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या.
 
पालिकेच्या ऑनलाइन विशेष सभेवर आक्षेप नोंदवत जनशक्तीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी सभेवर आक्षेप नोंदवला. ते म्हणाले,"" अशा विशेष सभा घेता येत नाहीत. त्यामुळे विशेष सभा रद्द करावी. सभापती स्मिता हुलवान यांनी सूचनेला पाठिंबा दिला. लोकशाही आघाडीनेही विशेष सभेविरोधात भूमिका मांडली.'' गटनेते सौरभ पाटील म्हणाले,"" प्रत्येक वेळी विशेष सभा बोलवू शकत नाही. विशेष सभा कधी घ्यायची, त्याचे नियम आहेत. प्रत्येक वेळी विशेष सभा घेता येणार नाही. त्यामुळे आजची विशेष सभा रद्द करावी आणि कोरोनासाठी स्वतंत्र सभा घ्यावी.''

चर्चेवेळी नगराध्यक्षा शिंदे व सभापती हुलवान यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. हुलवान म्हणाल्या, फोटो काढून फेसबुकवर मिरवण्याशिवाय नगराध्यक्षांनी काहीच काम केलेले नाही. नगराध्यक्षा शिंदे यांनीही प्रतित्त्युर देताना कोरोना काळात नागरिकांत मिसळून काम केले. आमची मापे काढू नयेत, असा हल्ला केला.

त्यावर हुलवान म्हणाल्या,"" नगराध्यक्षा आपण पदावर आहात. मात्र, केवळ फोटोसाठी मिरवता. विशेष सभा घेतली. त्यात कोरोनाचा एकही विषय नाही. 22 मार्चला होणारी सभा रद्द होऊन आज होत आहे. त्यात कोरोना विषयाची पुरवणी विषयपत्रिका येईल, असे वाटले होते. कोरोनाचा विषय घेण्यासाठी वेळ होता. तरीही तो घेतलेला नाही. यावरून तुमची शहरासाठी तत्परता दिसते. आपण खाली आवाज करून बोलावे. आपण एका सदस्यासोबत बोलत आहात, याचे भान ठेवून नळावर पाणी भरण्यासाठी आल्यासारखे भांडू नये.'' बहुमताने जो निर्णय घ्याल तो मान्य असेल, असे मुख्याधिकारी डाके यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वादावर पडदा पडला. त्यानंतर सभा सर्वानुमते रद्द झाली.

जनशक्ती, लोकशाही आघाडीने पालिका सभेत गोंधळ घातला : रोहिणी शिंदे

पालिकेची नुकतीच झालेली विशेष सभा ऑनलाइन असतानाही केवळ सभा होऊ द्यायचीच नाही, असे ठरवूनच जनशक्ती व लोकशाही आघाडीने सभेत गोंधळ घातला. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काहीतरी करतोय दाखविण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र, ही विशेष सभा कोणाच्याही दबावाखाली नाही तर सभेत काही विनाकारण होणाऱ्या गोंधळामुळे सदस्यांबद्दल चुकीची व नकारात्मक प्रतिमा शहरात तयार होऊ नये, म्हणून सभा रद्द केली अशी माहिती नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली. 

नगराध्यक्षा शिंदे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी सभेला केलेला विरोध चुकीचा आहे. पूर्वीच्या बैठकीचे इतिवृत्त लिहून होत नाही, तोपर्यंत सर्वसाधारण सभा घेता येत नाही. 19 जानेवारीला झालेल्या सभेत 148 विषय होते. पैकी 106 ठरावच स्वाक्षरीला आले आहेत. राहिलेल्या ठरावांसाठी वेळोवेळी सभा क्‍लार्कला मागणी करूनही आजतागायत ते दिलेले नाहीत. त्यामुळेच विशेष सभा घ्यावी लागली.

मात्र, जनशक्ती व लोकशाही आघाडीने ठरवून सभेत दंगा घातला. ते आधीच त्यांचे ठरले होते. त्यामुळे सभा ऑनलाइन असतानाही कोरोनाचा नियम तोडून पालिकेच्या हॉलमध्ये मोठे स्क्रीन लावून दोन्ही गट बसले होते. सभेची मिटिंगची विषयपत्रिका बऱ्याच दिवसापूर्वी निघाली होती. त्या सभेबद्दल कोणीही हरकत घेतली नाही; परंतु सभेत केवळ गोंधळ घालून सभा चालूच द्यायच्या नाहीत, असे धोरण त्यांचे होते. त्यामुळे दोन्ही आघाड्यांना गावच्या विकासापेक्षा स्वतःचा अहंमपणा महत्त्वाचा वाटतो. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारांचा शासनाला विसर; तब्बल चार वर्षांपासून पुरस्काराची घोषणाच नाही!

प्रत्येकानं Family Planning केलं असतं, तर लशीचा तुटवडा झाला नसता; खासदार उदयनराजे

पर्यटकांनाे! Covid 19 Test करुनच 'कास'ला या; आदेशाच्या अंमलबजावणीस प्रारंभ

चिलीम आणि कोंबडीचं रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होताे...! 

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top