Mahabaleshwar incident: प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला; महाबळेश्वरमधील पंचनद्यांचे उगमस्थान,'पुरातत्त्व'च्या दुर्लक्षपणामुळे नेमकं काय घडलं!

Krishnabai temple roof collapse Mahabaleshwar reason: महाबळेश्वरातील शतकांपूर्वीचे कृष्णाबाई मंदिर धोक्यात; छत कोसळल्यानंतरही पुरातत्त्व विभागाच्या निष्काळजीपणावर स्थानिकांचा संताप, वारसास्थळांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Mahabaleshwar incident: प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला; महाबळेश्वरमधील पंचनद्यांचे उगमस्थान,'पुरातत्त्व'च्या दुर्लक्षपणामुळे नेमकं काय घडलं!
Updated on

महाबळेश्वर : श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील प्राचीन श्री कृष्णाबाई मंदिराच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. मंदिरासमोरील गोमुखाखाली असलेल्या कुंडाची स्थानिक युवक स्वच्छता करीत असतानाच मंदिराचा छताचा काही भाग थेट कुंडामध्ये कोसळला. सुदैवाने युवक थोडक्यात बचावले. यामुळे वारसास्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे मंदिर सध्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येते आणि त्याची देखभाल व स्वच्छतेसाठी एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com