
सिद्धार्थ लाटकर
सातारा : विशेष मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प ट्रस्टतर्फे आता स्वमग्न (आॅटिझिम) मुलांसाठी आनंदबन आॅटिझिम केंद्र सुरू केले आहे. या केंद्रांमध्ये पाच ते १८ वर्षांच्या पुढील स्वमग्न असणाऱ्या मुले व मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. त्यांना गरजेनुसार आवश्यक असणारे उपचार तज्ज्ञांमार्फत देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रोटरियन डॉ. जवाहरलाल शहा यांनी दिली.
डॉ. शहा म्हणाले, ‘‘नव्या औद्योगिक वसाहतीमध्ये रोटरी क्लब आॅफ सातारा कॅम्प ट्रस्ट गेली ३४ वर्षे विशेष मुलांसाठी आनंदबन विशेष मुलांची शाळा व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालवत आहे. सध्या स्वमग्न असणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे. या विकारातील मुलांचे निदान शक्य तितक्या लवकर झाल्यास योग्य उपचाराने या मुलांना इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच शिक्षण, तसेच सुदृढ निरोगी आयुष्य मिळू शकते. ही एक मानसिक स्थिती असून, अशा मुलांसाठी जिल्ह्यात कोणतीही शाळा, केंद्र उपलब्ध नसल्याने रोटरीने आनंदबन आॅटिझिम केंद्र सुरू केले आहे.
या केंद्रांत भौतिक उपचार, वाचा उपचार, व्यवसाय उपचार, वैद्यकीय उपचार, संवेदना पूरक उपक्रम, खेळ उपचार, संगीतोपचार, वर्तन उपचार तसेच आवश्यकतेनुसार पालकांचे समुपदेशनही केले जाते.
दरम्यान या मुलांचा बुद्ध्यांक चांगला असतो; परंतु स्वमग्नतेमुळे, तसेच मनाच्या एकाग्रतेचा अभाव यामुळे ही मुले अभ्यासात मागे राहतात. या मुलांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण दिल्यास ही मुले मुख्य प्रवाहात येऊन इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे शैक्षणिक कारकीर्द पूर्ण करू शकतात. आनंबदन केंद्रात त्यांच्यावरील सर्व उपचार पद्धती माफक दरात आहे, असे डॉ. शहा यांनी नमूद केले.
ऐकू येत असूनही मुले बोलण्यास उशिरा शिकतात किंवा बोलत नाहीत.
घरातील व्यक्तींसमवेत अथवा समवयस्क मुलांबरोबर न खेळता स्वतःच्याच विश्वासात रममाण असतात.
एकच कृती किंवा वर्तन वारंवार करत राहतात.
एखाद्या खेळण्याशी, रुमालाशी खेळत बसणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.