

फलटण : येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची पोलिस दल व फॉरेन्सिक लॅब असे सर्व विभाग पारदर्शकपणे व योग्य दिशेने तपास करत आहे. राज्य महिला आयोग यावर लक्ष ठेवून आहे. गरज वाटल्यास हा तपास एसआयटीकडे सोपवण्यात येईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले.