
Crowd of aspirants gathers for Satara’s elected mayor post as both Rajes weigh their options for a winnable candidate.
Sakal
सातारा: साताऱ्याचा लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याची संधी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. या गर्दीतील नेमक्या आणि विजयी चेहऱ्याला तिकीट देण्यावर दोन्ही नेत्यांचा भर राहणार आहे. या गर्दीतील असा विजयी चेहरा कोण आणि तो विजयी चेहरा कसा ठरू शकतो, यासाठीची चाचपणी आगामी काळात होणार आहे. या चाचपणीत कोण मागे पडतो, कोणाला कोण मागे पाडतो आणि कोण उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतो, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.