esakal | सातारा : रस्त्यासाठी ग्रामस्थांचा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

सातारा : रस्त्यासाठी ग्रामस्थांचा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा

sakal_logo
By
फिरोज तांबोळी

गोंदवले : रखडलेल्या रस्त्याच्या (Road) कामासाठी रस्ता रोको आंदोलनासाठी जमलेल्या गोंदवल्यातील (Gondivali) ग्रामस्थांशी दुपार एक वाजता प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी चर्चा करणार आहेत.या चर्चेतून मार्ग काढून रस्त्याचे काम सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा पवित्र संतप्त ग्रामस्थांनी घेतला आहे.

सातारा लातूर महामार्गाचे अगदी काही मीटर अंतराचेकाम गोंदवल्यात गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. परिणामी पूर्वीचा रस्ता उखडल्याने ग्रामस्थांसह प्रवाश्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर मोठे खड्डे व राडारोडा झाल्याने वारंवार अपघात तर होतंच आहेत.शिवाय सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठ्याची जलवाहिनी बंद असल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय झाली आहे.या अनेक कारणांच्या सोडवणुकीसाठी महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्याची नितांत गरज आहे.

हेही वाचा: राज्यातील महिला सुरक्षेबाबत बैठक; गुन्हे कमी कसे होतील याबाबत चर्चा

याबाबत ग्रामपंचायतीने संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी आज सकाळी रस्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला.या आंदोलनासाठी लोक जमा होत असतानाच जमावबंदी आदेश असल्याच्या कारणाने प्रशासनाकडून अटकाव करण्यात आला.तसेच नायब तहसीलदार अंकुश ईवरे यांनी फोनवरून प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.प्रांताधिकारीही प्रसंगाचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.त्यातही आजच दुपारी एक वाजता बैठक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: भांडवलदारांना त्यांची जागा दाखवून देऊ; श्रमिक आघाडीचा थेट इशारा

दरम्यान आजच्या बैठकीत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागून काम सुरू न झाल्यास मात्र पुन्हा आंदोलन करण्याचा गर्भित इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

loading image
go to top