

Wrestling Fans Cheer as Sadgir–Guliya Kushti Ends Level
Sakal
पुसेगाव : श्री सेवागिरी यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध हिंदकेसरी, भारत केसरी दिनेश गुलिया यांच्यात मुख्य लढत झाली. दोघांनी एकमेकांवर चाल-प्रतिचाल करत आक्रमक खेळ केला. तब्बल पाऊण तास सामना रंगला. त्यानंतर गुणांवर देखील कुस्ती बरोबरीत सुटल्याने दोन्ही पैलवानांना ‘श्री सेवागिरी केसरी २०२५’ चा किताब व मानाची ‘चांदीची गदा’ देण्यात आली.