
कऱ्हाड: येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बेल्जियन शेफर्ड जातीचे बेल्जी श्वान दाखल झाले आहे. त्यामुळे फिरत्या पथकासोबत आता श्वानपथकही गस्त घालणार आहे. व्याघ्र प्रकल्पातील फिरत्या पथकाच्या वनरक्षक सारिका जाधव मुख्य डॉग हॅण्डलर व पाटणचे वनरक्षक अनिल कुंभार सहाय्यक डॉग हॅण्डलर आहेत. त्या दोघांनाही २६ जानेवारीपासून हरियाना येथील पंचकुला इंडो तिबेटियन सीमा सुरक्षा दलाच्या राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्रात २८ आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवले होते. त्यानंतर ट्रॅफिक इंडियातर्फे बेल्जियन शेफर्ड जातीचे श्वान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात उपलब्ध करूनदेण्यात आले. त्यामुळे श्वापदाची शिकार, अवैध व्यापारसहीत अवैध वृक्षतोडीवर आळा बसण्यास हातभार लागणार आहे.