सातारा : राज्यातील सैनिकी शाळांतून जास्तीतजास्त युवक एनडीएमध्ये जाण्यासाठी या शाळांनी चौकटीच्या बाहेर जाऊन यातील आव्हानांमधील सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या शाळांना येणाऱ्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर निश्चित प्रयत्न करेन, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.