'कृष्णा'च्या निवडणुकीवर बहिष्कार घाला; 'बळीराजा'चे शेतकऱ्यांना आवाहन

Sajid Mulla
Sajid Mullaesakal

कऱ्हाड (सातारा) : कृष्णा सहकारी साखर कारखान्याची (Krishna Co-operative Sugar Factory) होऊ घातलेली निवडणूक कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर तत्काळ रद्द करावी. कोरोनामुळे आपले कुटुंब अडचणीत येईल, याचा विचार करून शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे (Baliraja Farmer Association) जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला (Sajid Mulla) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. (Sajid Mulla Demand To Cancel The Election Of Krishna Sugar Factory Satara Political News)

Summary

कोरोनाविरुद्ध सध्या लढा सुरू आहे. मागील वर्षीही कोरोनाने अनेकांचा बळी घेतला. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

निवेदनातील माहिती अशी, कोरोनाविरुद्ध सध्या लढा सुरू आहे. मागील वर्षीही कोरोनाने अनेकांचा बळी घेतला. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याही वर्षी कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे दोन महिने प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात लाकडाउन सुरू आहे. तरीही कोरोनाचे प्रमाण कमी होत नाही. अशातच कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Krishna Sugar Factory Election) जाहीर झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोनाने थैमान घातले असतानाच कृष्णा कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने बळीराजा शेतकरी संघटना त्याचा निषेध करत आहे.

निवडणूक लागली म्हणजे प्रचारसभा, मेळावे सुरू होणार. त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात होणार. कारखान्याचे कार्यक्षेत्र दोन जिल्ह्यांत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढणार आहे. कारखान्याच्या सभासदांच्या जिवावर उठून जर ही निवडणूक लढवणार असाल तर त्याला आमचा विरोध राहील. राजकीय पक्ष (Political Party) निवडणूक लढवून मोकळे होतील. कोरोनामुळे आपले कुटुंब अडचणीत येईल, याचा विचार करून शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा. प्रशासनाने कोरोनाचे प्रमाण कमी होत नाही, तोपर्यंत निवडणूक पुढे ढकलावी, असेही श्री. मुल्ला यांनी नमूद केले आहे.

Sajid Mulla Demand To Cancel The Election Of Krishna Sugar Factory Satara Political News

Sajid Mulla
मतदारांच्या जीवाशी खेळ! 'कृष्णा'ची निवडणूक ताबडतोब रद्द करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com