Sakal Impact : धुमाळ आळीतील रस्त्याची अखेर दुरुस्ती
Road Repaired : सातारा येथील धुमाळ आळी परिसरातील रस्ता खचू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.'सकाळ'च्या वृत्तानंतर पालिकेने तत्काळ दखल घेऊन दुरुस्ती केली व वाहतूक सुरळीत केली.
सातारा : धुमाळ आळी परिसराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचा भाग खचण्यास सुरुवात झाली आहे. याबाबतची बातमी दैनिक ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर पालिका प्रशासनाने त्याठिकाणची दुरुस्ती करत निर्धोक वाहतुकीसाठी मार्ग खुला केला.