चोरांबेकरांचा निर्धार.. यंदा स्मार्ट ग्राम हाेणारच

चोरांबेकरांचा निर्धार.. यंदा स्मार्ट ग्राम हाेणारच

मेढा (जि.सातारा)  : "सकाळ'च्या वतीने सुरू असलेले जलस्रोत वाढवणे, पाणी साठवणे आणि पाणीटंचाईवर मात करण्याबाबतचे काम निश्‍चित आदर्शवत आहे, असे प्रतिपादन जावळीचे तहसीलदार शरद पाटील यांनी केले.
कऱ्हाडातून घरी परतले 20 कोरोनामुक्‍त रुग्‍ण 

चोरांबे (ता. जावळी) येथे सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून तलावाचे खोलीकरण व रुंदीकरण कामाच्या प्रारंभप्रसंगी तहसीलदार श्री. पाटील बोलत होते. या वेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, तनिष्का व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण, चोरांब्याचे सरपंच विजय सपकाळ, तनिष्का गटप्रमुख सुवर्ण सपकाळ, तनिष्का सदस्या भारती सपकाळ, वंदना सपकाळ, सविता सपकाळ, रंजना सपकाळ, ज्योती सपकाळ, पोलिस पाटील तुषार सपकाळ, विनोद सपकाळ, सर्वोदय क्रांती मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या. गटविकास अधिकारी बुध्दे यांनी "सकाळ'च्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
गाव करील ते राव काय करील!
 
सरपंच सपकाळ यांनी "सकाळ'चे धन्यवाद मानून गावात केलेल्या वृक्षलागवड, जलसंधारण, ओढा रुंदीकरण व खोलीकरण, बंधारे बांधकाम, रस्ते, वीज, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, कृषी, महिला समक्षीकरण अशा विविध कामांची माहिती दिली. या कामामुळे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात चोरांबेला तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळाल्याचे सांगून यंदा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवण्याचा मानस व्यक्त केला. माजी आमदार सपकाळ यांनी स्वागत केले. अकुंश सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले. बातमीदार विजय सपकाळ यांनी आभार मानले.

या उपक्रमासाठी मुस्लिम बांधवांनी सहकार्य केल्याने त्यांचे आभार मानण्यात आले 

हत्ती गेला अन्‌ शेपूट राहिले, 'यांच्या' कर्जमाफीचे पैसे द्यायचे काेणाला? 

पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आला नवा आदेश; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी वाचा; अन्यथा तुमच्यावरही हाेऊ शकते कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com