सातारा : ‘सिव्‍हिल’मध्ये पगाराची परवड

महिना संपत आला तरी पत्ता नाही; जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष देण्याची गरज
सातारा : ‘सिव्‍हिल’मध्ये पगाराची परवड
Summary

महिना संपत आला तरी पत्ता नाही; जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष देण्याची गरज

सातारा : जिल्हा रुग्णालयातील (district hospital) लिपिकांच्या(clerk) कारभारामुळे महिना संपत आला तरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे आर्थिक गाडा हाकताना कर्मचाऱ्यांची परवड होत आहे. पगाराची दरवेळी होणारी ओरड थांबविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सातारा : ‘सिव्‍हिल’मध्ये पगाराची परवड
सावधान : 'ऑनलाईन गेम्स'मुळे मुलांचे आयुष्य धोक्यात

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या उपचारांमध्ये जिल्हा रुग्णालय महत्त्‍वाची भूमिका बजावत असते. संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक आपल्या विविध आजारांवरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण तसेच आंतररुग्ण विभागात उपचार घेत असतात. रुग्णालयाच्या अधिकृत बेडच्या संख्येपेक्षाही जास्त रुग्ण उपचारासाठी दाखल असतात. त्याचबरोबर बाह्यरुग्ण विभागातही हजारोच्या संख्येने दररोज रुग्ण येतात. येणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तरीही वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ व चतुर्थश्रेणी कर्मचारी आपली सेवा बजावतात.

रुग्णालय प्रशासनासमोर आपल्या मागण्या मांडण्याबरोबरच त्यांच्या निर्देशानुसार आहे, त्या मनुष्यबळात रुग्णालयाचा गाडा सुरळीत हाकण्याचे काम सर्वजण करत असतात. कोरोना संसर्गाच्या काळातही या सर्वांनी जिल्ह्यातील नागरिकांना जीवदान देण्यात महत्त्‍वाची भूमिका बजावली. कोरोनाबाधित होऊनही ते आपल्या कर्तव्यात कायम तत्पर राहिले.

सातारा : ‘सिव्‍हिल’मध्ये पगाराची परवड
करिअर, कौशल्यांसाठी 'ऑनलाईन गेम्स’ उत्तम; ‘AIGF'चा अहवाल

अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाला ज्याप्रमाणे कामाची अपेक्षा असते. त्याचप्रमाणे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचारही प्रशासनाला करणे आवश्यक आहे. परंतु, त्यांच्या महत्त्‍वाच्या गोष्टींबाबतही जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून योग्य ती कारवाई काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सर्वांत महत्त्‍वाचे ते पगार वेळेत मिळणे. पगाराच्या तारखेवर सगळ्यांचीच अनेक गणिते अवलंबून असतात. घरगाडा चालवण्यासाठी आवश्यक असलेली बरीच देणी तारखेनुसार ठरलेली असतात. त्याचबरोबर घर, गाड्यांच्या हप्त्यांचाही विषय असतो. त्यामुळे वेळेत पगार न झाल्यास मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com