बियाणांच्या बाबतीत साताऱ्याचा ब्रॅंड विकसित करा; खासदार पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Shrinivas Patil

बियाणांच्या बाबतीत साताऱ्याचा ब्रॅंड विकसित करा; खासदार पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : वातावरणातील बदलांसह बाजारपेठेतील मागणीनुसार उत्पादन घेतले पाहिजे. त्यासाठी बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी बदल घडवला पाहिजे, असे मत खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांनी व्यक्त केले. (Sales Of Fertilizers Started At Karad Satara News)

कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांच्या शेतावर ग्रामबीजोत्पादन माध्यमातून सोयाबीन बियाण्यांची पैदास, पायाभूत ते प्रमाणित व सत्यप्रत बियाण्यांची साखळी विकसित करण्यासह खतांच्या विक्रीस प्रारंभ झाला. त्या वेळी खासदार पाटील बोलत होते. उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, सारंग पाटील, कृषी अधिकारी रियाज मुल्ला, कृषी अधिकारी रवी सुरवसे, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र चव्हाण, कृषी सहायक सतीश रणपिसे, विजयसिंह भोसले, तानाजी जाधव, अनुराग भोसले, विनोद सूर्यवंशी, विक्रम जाधव उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून निर्मित कंपन्यांनी तयार केलेल्या सत्यप्रत बियाणांच्या विक्रीसही आज खासदार पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला.

हेही वाचा: 21 वं शतक अन् 21 वा दिवस; वाचा आजचा दिवस कसा आहे प्रत्येकासाठी खास..

पेरलेच्या शेतकऱ्यांच्या स्वयंसहायता गटातून निर्मित झालेल्या कंपनीने 228 फुले कल्याणी सोयाबीन बियाणाची निर्मिती केली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून त्यासाठी पैदासकार बियाणे घेतले होते. पायाभूत निवडलेले बियाणे योग्य तपासणी करून प्रमाणीत केले. त्यानंतरच सत्यप्रत बियाणांची निर्मिती झाली. खासदार पाटील म्हणाले, ""शेतकऱ्यांनी गट तयार करून पुढाकाराने स्वतःचे बियाणे स्वतः तयार करावे. त्या बियाण्यांची इतरांना विक्री करून जास्तीतजास्त मोबदला घ्यावा. परिसरातील शेतकऱ्यांना योग्य, माफक दरात खात्रीशीर उगविण्याची क्षमता असलेले बियाणे उपलब्ध करून द्यावे. बियाण्यांच्या बाबतीत साताऱ्याचा ब्रॅंड विकसित करावा.''

प्रतापगडावरील तटबंदीची मोहीम 11 महिन्यांत फत्ते

Sales Of Fertilizers Started At Karad Satara News

loading image
go to top