

Sangli District Bank Election
esakal
सांगली : जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी १४७ जणांनी अर्ज दाखल केले. एकूण २१ जागांसाठी विक्रमी ३५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल केलेल्यांत आजी, माजी आमदार आणि खासदारांसह दिग्गजांचा समावेश असल्यामुळे निवडणुकीत रंगत येणार असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी बँकेच्या मुख्यालयातील निवडणूक कार्यालयात उमेदवारांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. आज दाखल केलेल्यांमध्ये बँकेचे विद्यमान संचालक प्रकाश जमदाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख व उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे, दिनकर पाटील, कडेगाव पंचायत समितीचे सभापती जितेश कदम, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, बसवराज पाटील, चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील, सदाशिव खाडे, शिकंदर जमादार, केदार नलवडे, महादेव अंकलगी, बाबासाहेब माळी, किरण लाड, समित कदम, प्रतिभा वैभव पाटील, वैभव पवार, नीलेश येसुगडे, हणमंत देशमुख यांच्यासह १४७ जणांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जांची सोमवारी (ता. ५) छाननी होणार आहे. प्रथमच मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने मोठी चुरस निर्माण होणार आहे.
या दिग्गजांचे अर्ज खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार विश्वजित कदम, सुरेश खाडे, सत्यजित देशमुख, गोपीचंद पडळकर, इद्रिस नायकवडी, माजी आमदार अजितराव घोरपडे, विक्रमसिंह सावंत, सुमनताई पाटील, विद्यमान संचालक महेंद्र लाड, संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज पाटील, वैभव शिंदे, चिमण डांगे, मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, अनिता सगरे, अमोल बाबर, देवराज पाटील आदी दिग्गजांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.