

Sangli District Bank Election
esakal
सांगली : ‘‘सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लवकरच जाहीर होणार असली तरी सहकारात पक्षीय राजकारण नको. यापूर्वी जिल्ह्यात कधीही सहकारात पक्षाच्या चिन्हावर निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे पक्षीय भावनेने बँकेकडे पाहू नये, ’’ असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना आज येथे लगावला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सहकारतपस्वी गुलाबराव पाटील जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आमदार पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यात सहकाराचे मोठे जाळे आहे. स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील यांनी सहकार वाढविला; मात्र त्यामध्ये पक्षीय राजकारण कधीही केले नाही. त्यामुळे सहकारात पक्षीय राजकारण कुणीही करू नये.’’ ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे.
तासगाव आणि खानापूर तालुक्यांत काहीसा पाऊस झाला. उर्वरित भागात पाऊस झालेला नाही. पिकांची परिस्थिती भयावह बनत चालली आहे. कोयना आणि वारणा धरणांत पुरेसा पाणीसाठा आहे. सद्यःस्थितीत पिकांना पाण्याची गरज असताना उपसाबंदी लादली आहे. पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन उपसाबंदी मागे घेण्यात यावी. भात, सोयाबीन करपू लागले आहेत. कोयनेतील ६७ टीएमसी पाणीसाठा वीजनिर्मितीला वापरला जातो.
’’ ते म्हणाले, ‘‘सध्याची परिस्थिती लक्षात घेता वीजनिर्मिती कमी करून करपणाऱ्या पिकांना जीवनदान द्यावे. राज्यात उन्हाच्या चटक्यांनी पिके कोमजली आहेत, त्यामुळे तत्काळ पंचनामेही करण्याची गरज आहे, याबाबतची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करावा.’’
‘‘त्या’ कारखान्यांवर कारवाई करा’ आमदार पाटील म्हणाले, ‘‘कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग बदलला असून, मळीमिश्रित पाणी आले आहे. त्याचे काही जणांकडून राजकारण केले जाते; मात्र नेमक्या कोणत्या कारखान्यांकडून पाणी सोडले जाते, याची पडताळणी करून संबंधित कारखान्यांवर कारवाई करावी.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.