esakal | गांधी जयंतीनिमित्त पाचगणीत होणार वृक्षांची लागवड; पब्लिक स्कूलचा पुढाकार I Mahatma Gandhi Jayanti
sakal

बोलून बातमी शोधा

Mahatma Gandhi Jayanti 2021

पांगारी (ता. महाबळेश्वर) येथील अंजुमन पब्लिक स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत याचे नियोजन झाले.

गांधी जयंतीनिमित्त पाचगणीत होणार वृक्षांची लागवड

sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (सातारा) : पश्चिम घाट वाचवा अभियानांतर्गत महात्मा गांधी (Mahatma Gandhi Jayanti 2021) यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त गांधी स्मारक समिती (Gandhi Memorial Committee) आणि अंजुमन पब्लिक स्कूलच्या संयुक्त विद्यमाने 152 विशेष रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती महात्मा गांधी स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली.

पांगारी (ता. महाबळेश्वर) येथील अंजुमन पब्लिक स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत याचे नियोजन झाले. या बैठकीला असलम तडसरकर, महेंद्र पांगारे, रविकांत बेलोशे, प्रा. माहरुख पटेल, कादिर शेख, खान, सादिक बागवान व महात्मा गांधी स्मारक समिती सदस्य उपस्थित होते. या बैठकीत महात्मा गांधी यांची 150 वी जयंती असल्याने याचे औचित्य साधून स्मारक समिती व स्कूलच्या वतीने 152 जैवविविधता रोपांची लागवड अंजुमन स्कूल परिसरात करण्याचे ठरवण्यात आले. त्याचबरोबर यावेळी राष्ट्रीय एकात्मता, मैत्री आणि शांती याविषयी जनसंवाद उपक्रम आयोजित करण्याचे ठरले.

हेही वाचा: UPSC मुलाखतीला मिळालेत सर्वाधिक गुण; वाचा पहिला प्रश्न आणि उत्तर

या सर्व कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून महात्मा गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी राऊत, अंजुमन स्कूल पाचगणीचे शिक्षणतज्ञ डॉ. बशीर पटेल, ज्येष्ठ सर्वोदयी विजय दिवाण हे उपस्थित राहणार आहेत. उद्या 2 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता कस्तुरबा गांधी आरोग्य केंद्रात अभिवादन कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता होईल, तर अंजुमन हायस्कूल पांगारी येथे जनसंवाद कार्यक्रम, रोप लागवड व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. बशीर पटेल यांनी संयुक्त संयोजन समितीच्या वतीने दिली. तसेच सातारा येथे मौलाना अबुल कलाम आझाद मैदान येथे 15 ऑगस्ट राष्ट्रीय उत्सव मंडळाच्या वतीने महात्मा गांधी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. स्वातंत्र्य हिरक महोत्सव 75 अमृत महोत्सवी संयोजन उपक्रमात गांधी जयंतीनिमित्त एकता मैत्री शांती संदेश द्यावा, असे आवाहन स्वातंत्र्य सैनिक पतंगराव फाळके, प्रा. विक्रांत पवार, प्रकाश खटावकर विजय निकंम, सचिव गांधी स्मारक समिती यांनी केले आहे.

loading image
go to top