
कुडाळ: सर्जापूर (ता. जावळी) येथील विकास सेवा सोसायटीला जावळी तालुका पातळीवरील सर्वोत्कृष्ट कामकाज व १०० टक्के वसुली या कामाबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या उपस्थितीत सोसायटीचे अध्यक्ष उत्तम मोहिते, उपाध्यक्ष सावता बोराटे, ग्रामपंचायत सदस्य देविदास बाराटे व अन्य पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.