esakal | कण्हेर जलाशयात बुडणाऱ्या व्यक्तीला सरपंचांनी वाचवले
sakal

बोलून बातमी शोधा

कण्हेर जलाशयात बुडणाऱ्या व्यक्तीला सरपंचांनी वाचवले

कण्हेर जलाशयात बुडणाऱ्या व्यक्तीला सरपंचांनी वाचवले

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (सातारा) : मेढा येथील कण्हेर जलाशयात बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव पिंपरीचे सरपंच शांताराम वांगडे यांनी आज वाचवून त्या व्यक्तीला जीवदान दिले आहे. स्वतः चा जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या चे प्राण वाचवणाऱ्या शांताराम वांगडे यांच्या या धैर्याचे कौतुक होत आहे. वांगडे यांनी दाखवलेल्या या धैर्याबद्दल आज मेढा येथे एका कार्यक्रमात उपविभाग पोलीस अधिकारी शीतल खराडे-जानवे, तहसीलदार राजेंद्र पोळ, सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या हस्ते वांगडे यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: ‘किसन वीर’ ची निवडणूक लढवू : आमदार पाटील

आज सकाळी मेढा येथे पोलीस ठाणे मेढा येथे येत्या गणेशोत्सव कार्यक्रमाची जावली तालुक्यातील सरपंच पोलीस पाटील आणि उत्सव मंडळे यांची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीसाठी पिंपरी तर्फ मेढा गावचे सरपंच शांताराम उर्फ संतोष वांगडे हे ही गेले होते. बैठक संपल्यावर ते परत आपल्या घरी पिंपरी येथे येणेसाठी आपल्या मोटरसायकल वर बसून निघाले. वाटेत मेढा मोहाट पुलावरून जात असताना, पुलाच्या मध्यावर एक वयोवृद्ध मोहाट गावचे बाजीराव बुवा धनावडे हे पुलावरुन मोहाटकडे जात असता त्यांची वागणूक संशयास्पद दिसली त्यांना संशय आला.

म्हणून सरपंचानी आपल्या गाडीचा वेग कमी केला ते एकदा खालच्या बाजूला तर एकदा वरच्या बाजूला जात होते. शेवटी ते वरच्या बाजूला थांबले. आणि कटाड्यावर चढले. आणि त्यानी नदी पात्राच्या खोल पाण्यात उडी मारली. आणि हे सरपंचानी पाहीले. आणि आपली चालू गाडी तिथेच सोडली. आणि जिथून त्या व्यक्तीने उडी मारली तेथून उडी मारण्यासाठी सज्ज झाले. पण त्यांच्या लक्षात आले. या नव्या पुलाखाली ब्रिटिशकालीन लोंखडी पुल आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही त्रास होऊ शकतो. म्हणून त्यानी तो विचार बदलला.

हेही वाचा: चिंतेचं गोठोडं घेऊन जितकरवाडीकर घरांकडे

मेढा बाजूला पळत सुटले. पळताना हाताने कपडे कपडे काढत खिशातील वस्तू मोबाईल, घड्याळ व पाकिट रस्त्यावर सोडत वरच्या बाजूला अर्धा किलोमीटर जवळजवळ पळत आले. रस्त्यावरून नदीत उडी मारली. एका मिनटात दीडशे ते दोनशे फुट अंतर पार करत त्यानी त्या वृध्दाला पकडन्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत तो माणूस तीन डुबक्या घेऊन वर आला. आणि सरपंचानी त्याच्या कमरेला पकडले.

पण तो म्हातारा ओरडत होता. सोडा मला मला मरायचे आहे. असे म्हणून तो आपल डोके पाण्यात बुडवत होता. मग सरपंच शांताराम वांगडे यानी त्याची मान पकडली आणि परत त्याच दमात दीडशे दोनशे फुट अंतर एका हातात हे वृध्द आणि दुसऱ्या हाताने पाणी कापत नदीकाठी आले. आणि या वयोवृद्ध गृहस्थाचे प्राण वाचवले.

आज रस्त्यावर कितीतरी अपघात होतात. माणसांची माणुसकी संपली असे म्हणतात. पण आज माणुसकी आणि धाडस आमच्या जावळी त जिंवत आहे. यांचे मुर्तीमंत उदाहरण शांताराम वांगडे आहेत. शांताराम वांगडे यांच्या या असामान्य धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

loading image
go to top