
Rupali Chakankar testifies in Sasapde murder case; demands swift justice and strict punishment for the accused.
Sakal
सातारा : सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या झाली आहे. तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाणार आहे. राज्य महिला आयोगामार्फत संशयिताला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शिफारस करणार असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले.