सातारा जिल्ह्यात 14.69 मिलीमीटर पाऊस, काेयना धरण 73.61 टीएमसी भरले

सातारा जिल्ह्यात 14.69 मिलीमीटर पाऊस, काेयना धरण 73.61 टीएमसी भरले

सातारा  : सातारा शहरात आज (गुरुवार) सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे बाजारपेठेसह मंडई परिसरात नागरिकांची धांदल उडाली. दरम्यान सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 14.69 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

या गावात स्वातंत्र्यदिनाचा साक्षीदार अडगळीत 

सातारा जिल्ह्यात आज (गुरुवार) सकाळी आठ वाजेपर्यंत सातारा  तालुका11.85 (528.13) मिलीमीटर , जावली – 27.35 (935.38), पाटण – 20.82 (891.63),  कराड – 5.31 (405.69) , कोरेगाव – 7.22 (359.50),  खटाव – 3.59 (310.41), माण – 0.14 (278.00) , फलटण – 2.56 (270.18), खंडाळा – 8.75  (320.25), वाई – 12.00 (500.69), महाबळेश्वर – 123.08 (3255.26)  इतका मिली मीटर पाऊस झालेला आहे.

मुख्यमंत्र्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची काँग्रेस खासदारांची टीका

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 8055.10  मिली मीटर तसेच सरासरी 732.28 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 7.46 (63.78), धोम -बलकवडी- 3.41 (86.05), कण्हेर – 7.33 (76.38), उरमोडी – 8.44 (87.48), तारळी- 4.32 (73.97), निरा-देवघर 6.91 (58.90), भाटघर- 16.69 (71.03), वीर – 9.20 (97.85).

महिलेवर बलात्कारप्रकरणी साताऱ्यात दोघांवर गुन्हा

कोयना धरणात आज (गुरुवार) 73.61 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यांची टक्केवारी 73.52 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 58 नवजा येथे 101 व महाबळेश्वर येथे 120  मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com